गुरुवार दिनांक म्हणजेच 8 ऑगस्ट 2024 रोजी खानापूर आटपाडी विधानसभा क्षेत्र निहाय समितीचे अध्यक्ष अमोल बाबर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेची बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अनुषंगाने पोर्टलवर छाननी अंति पात्र ठरलेल्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधील महिलांना योजनेचे लाभ देण्यास अंतिम मान्यता मान. अध्यक्षांच्या उपस्थित देऊन शासनास शिफारस करण्यात आली.
सदर बैठकीमध्ये खानापूर तालुक्यातील एकूण 23868 आटपाडी तालुक्यातील एकूण 19344 अर्जांना छाननीअंती मंजुरी करण्यात आली. यामधील तात्पुरते नाव मंजूर झालेले तीन हजार सहाशे सत्तर अर्ज असून त्यांनी अर्जातील त्रुटींची पूर्तता दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करावी असे आवाहन मान. अध्यक्ष अमोल बाबर यांनी केले.
तसेच अध्यक्षांनी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचा आढावा घेऊन सर्व लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळावा यासाठी सर्व संबंधितांना सहकार्य करावे असे आवाहन केले. मतदारसंघातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व खाते प्रमुख अंगणवाडी सेविका सेतू व महा-ई-सेवा यांनी घ्यावी तसेच लाभार्थ्यांकडून अर्ज भरण्यासाठी आर्थिक मागणी करू नये अशा प्रकारच्या घटना आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी सूचना अध्यक्ष अमोल बाबर यांनी केल्या.