जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांच्यावर करण्यात आला आहे. आटपाडी येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेस काळे फसले. आणि यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत तहसील कार्यालय आणि पोलिसांना निवेदन देण्यात आले. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर काही वर्षांपूर्वी हल्ला झाला होता. या घटनेमागे रोहित पवार यांचा हात असल्याचे महादेव देवकाते यांच्यामुळे समोर येत आहे.
सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सदैव संघर्ष करणाऱ्या आमदार पडळकर यांच्याविरोधात कारस्थान करणारे आमदार रोहित पवार यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून या कटात सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनात विनायक पाटील, यु. टी. जाधव, अरविंद जाधव, विष्णू अर्जुन, दादासाहेब मोटे, सुधाकर जाधव, जयवंत सरगर, विकास भुते, स्नेहजित पोतदार, चंद्रकांत दौंडे, योगेश जैन, आनंद देशमुख, यशवंत मेटकरी, विजयकुमार बालटे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
