आटपाडी नगरपंचायत क्षेत्रातील ब्राह्मण गल्ली येथे गटारीची दुर्दशा झाली आहे. गटार पूर्णपणे उखडली गेली असून तिचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. परिणामी सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने पाण्याचा उग्र वास येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तर मुख्य जुनी आटपाडी क्षेत्राकडे नगरपंचायतीने दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.
आटपाडी नगरपंचायत अस्तित्वात येऊन २ वर्षे होत आली आहेत. येणारा सर्व निधी हा नव्याने वसणाऱ्या भागाकडेच खर्च केला जात आहे. हा निधी मूळ जुनी असणारी आटपाडी यांच्या सुविधेसाठी दिला जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
जुन्या आटपाडी शहरातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. गटारी फुटून गेल्या गटारची अवस्था अतिशय दयनीय असून नगरपंचायतकडे ती दुरुस्त किंवा नव्याने करण्याची मागणी अनेकवेळा केली आहे. जुन्या आटपाडीच्या विकासाकडे नगरपंचायतने दुर्लक्ष केले असून जनसुविधा पुरवाव्यात. ब्राह्मण गल्लीमधील गटर तुडुंब भर असल्याने सांडपाण्याचा उग्र वास येत आहे तर डासांनी उच्छाद मांडला आहे. यामुळे कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी सांडपाणी रस्त्यावर काही ठिकाणी येऊ लागले आहे. गटार साफ केली जात नाही. परिणामी डासांनी उच्छाद मांडला आहे. गटर नव्याने करण्याची येथील रहिवाशांनी मागणी केली आहे.