महाराष्ट्रातल्या मुस्लीम खाटीक समाजात गत ४ पिड्यांपासून शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतीक क्षेत्रात अव्वल स्थान निर्माण करण्यात आटपाडीच्या नवसरलाल कलाल, मिठुलाल कलाल यांच्या परिवाराचा आदर्शाचे सर्वांनी अनुकरण करावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष, कुरेश कॉन्फरसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतले गेलेल्या MPSC च्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवत महसूल सहाय्यक अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सांगोला येथील कु. सना फारूक खाटीक यांचा तसेच महसूल सहाय्यक पदी निवड झालेल्या आटपाडीच्या उबेद उर्फ उमेद अस्लम पेंढारी यांचा तसेच राज्य कर सहाय्यक बनलेल्या सांगली येथील कु. फिरदोस मजिद खाटीक या तीन प्रज्ञावंताचा आटपाडी येथे सादिक खाटीक यांच्या तसेच अभियंता असिफ कलाल यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
यावेळी कुरेश कॉन्फरन्सचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष इंजिनियर असिफ कलाल, कुरेश कॉन्फरन्सचे प. म. सरचिटणीस असिफ उर्फ बाबु खाटीक, यप्पावाडीचे सरपंच संभाजीराव माने, सामाजीक कार्यकर्ते इकबाल पेंढारी, रियाज शेख, सलमान शेख, रहिमान खाटीक, नितीन डांगे, कुर्बान हुसेन खाटीक, जुनेद पेंढारी, सांगोला येथील फारूक खाटीक, अजिज खाटीक, आब्बास खाटीक, कासीम खाटीक, हैदर खाटीक, सांगली येथील असिफ मस्जीद खाटीक, हिना असिफ खाटीक उपस्थित होते.