इचलकरंजीतील बनावट सोने देऊन आठ लाखांची फसवणूक

मुसळे याने गुप्ता यास स्वस्तात सोने देतो, असे आमिष दाखविले व गुप्ता याच्याकडून ८ लाख रुपये घेतले. त्यानंतर अनोळखी संशयिताच्या मदतीने गुप्ता यांना नकली सोन्याचा हार देऊन फसवणूक केली आहे.यड्राव स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवत बनावट सोने देऊन ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला. संतोष तुकाराम मुसळे ( वय ४५, रा. सावली सोसायटी, शहापूर) व अनोळखी इसम आहेत. याबाबत रामप्रवेश भाग्यनारायण गुप्ता (वय ४५, रा. शामनगर, यड्राव, मूळ रा. परशुरामपूर, ता. पिनहारा, जि. मोतीहारी, बिहार) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, संशयित मुसळे याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.