सुळकुड पाणी योजनेसाठी चर्चा करूनच…..

इचलकरंजी शहरातील पाणी प्रश्न हा जगजाहीर आहेच. पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते. इचलकरंजी शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा होण्याचे दृष्टीने सुळकूड पाणी योजनेसाठी मी प्रयत्नशील आहे तसेच कृती समितीच्या मताशी मी सहमत असून आपण प्रत्यक्ष भेटून चर्चा करू आणि निर्णय घेऊया असे पत्र आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीला दिलेले आहे. सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने 26 सप्टेंबर रोजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. यानुसारच आमदार आवडे यांनी आपल्या भूमिकेबाबतचे पत्र कृती समितीला दिलेले आहे.