शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही….

उपमुख्यमंत्री पवार रविवारी कोल्हापूर दौर्‍यावर आले असता शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदनही सादर केले. शक्तिपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यांतील शेतकर्‍यांचा विरोध आहे.

माझाही शक्तिपीठ महामार्गाला ठाम विरोध आहे. त्यामुळे हा महामार्ग होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.कोल्हापूरची हद्दवाढ करायची आमची तयारी आहे. पण स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये हद्दवाढीवरून मतमतांतरे असल्याने इच्छा असूनही हद्दवाढ करता आली नाही.

स्थानिक लोकप्रतिनिधीही 3 ते 4 लाखाच्या मतदारांमधून निवडून आलेला असतो. त्यामुळे त्याला लोकांचेप्रश्न आणि भावना माहीत असतात. त्यामुळे याबाबतीत इच्छा असूनही शासन निर्णय घेऊ शकत नसल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.