श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना! सात भाविकांचा मृत्यू, 12 जण जखमी….

बिहारच्या जहानाबाद येथील सिद्धेश्वरनाथ मंदिरात मोठी दुर्घटना घडली. श्रावण सोमवार असल्यामुळे भगवान शिवच्या जलाभिषेकाच्या वेळी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये सात भाविकांचा मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत १२ पेक्षा अधिक भाविक जखमी झाले असून, त्यांच्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.

बिहारमध्ये सिद्धेश्वरनाथ मंदिरात श्रावण सोमवारी भगवान शिवला जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिरात प्रवेशासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी अचानक धक्का-मुक्कीमुळे रेलिंग तुटल्याने ही चेंगराचेंगरी घडली. भक्तांची धावपळ सुरु झाली आणि त्यामुळे हे दुर्दैवी अपघात घडला.