हा मेसेज आला असेल तरच मिळणार 3000 रुपये…..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चांगलीच चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी काही अटी ठेवल्या आहेत.

ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे त्यांना मोबाईलवर एक मेसेज सरकारकडून पाठवण्यात आला आहे. हा मेसेज इंग्रजीतून आलेला आहे. “Your application no (अर्जाचा नंबर) for MMLBY has approved – WCD, GOM – MAHGOV”, असा मेसेज लाभार्थी महिलांच्या मोबाईल नंबरवर येत आहेत. त्यामुळे तुम्हालादेखील असा मेसेज आला असेल तर तुम्हालादेखील या योजनेचा फायदा मिळणार आहे.

तुमच्यादेखील बँक खात्यात येत्या 17 ऑगस्टला 3000 रुपये जमा होणार आहेत.या योजनेबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी आज परभणीत बोलताना आणखी एक खूशखबर दिली आहे. “लाडली बहीण योजनेसाठी 46 हजार कोटी वर्षाला लागणार आहेत. अर्थ विभागाने तो निधी आम्हाला वितरीत केला आहे.

17 तारखेचा पहिल्या हप्त्याचा निधीसह पुढचे सहा महिन्यांचा निधीची तरतूद केली आहे. त्यानंतर होणाऱ्या अर्थसंकल्पात सादर होईल ते उपलब्ध होईल”, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे पुढचे 6 महिने तरी लाभार्थी महिलांना या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपये मिळणार हे निश्चित आहे.