आगामी विधानसभा निवडणुकीबाबतीत मा. आम. दिपकआबांचे वक्तव्य

सध्या दिपकआबा साळुंखे पाटील यांचा गाव भेट जनसंवाद दौरा सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यथा, अडचणी ते दूर देखील करताना पाहायला मिळत आहे आणि अशातच या गाव भेट दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद देखील मिळत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सांगोला तालुक्यातील विधानसभा निवडणुक लढवण्याच्या बाबतीत आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, मी की मी गेली 30 वर्षे सातत्याने तालुक्याच्या तसेच सांगोल्याच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये काम करीत आहे.

आम्ही कायमच लोकात राहणारा कार्यकर्ता आहे. माझे वडिल कै. काकासाहेब, कै. काकी असतील किंवा मी असेल सर्वसामान्य माणूस हाच आमचा केंद्रबिंदू आहे.आम्ही अनेक निवडणुकीमध्ये अनेकांना मदत केली आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तालुक्यातल्या जनतेची मी उभे रहावे अशी मनापासून इच्छा आहे. गेली साडेचार वर्षे मी आणि तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील दोघेही मिळून समन्वयाचे राजकारण करत आहोत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील आमच्या दोघांचे समन्वयाचेच राजकारण असणार आहे.

मी बापूंना संधी दिलेली आहे आता या वेळेला तालुक्यातल्या जनतेची इच्छा आणि कुटुंबाचे ज्येष्ठ बापू आहेत त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील आणि मला न्याय मिळेल अशी अपेक्षा दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केली.