लग्नानंतर बदललेलं नाव, चुकलेली जन्मतारिख किंवा धर्म बदलाची नोंद करणे याच्यासाठी गॅझेट काढावे लागते. ही प्रक्रिया पूर्वी ऑफलाइन आणि कीचकट असल्याने नागरिकांना एजंट किंवा तत्सम लोकांकडे खेटे मारावे लागत होते.तसेच एजंट लोकं अधिकचे पैसे उकळत असल्याने नागरिकांना आर्थिक भूर्दंड बसत होता. परंतू शासनाने आता गॅझेटसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून दिली असल्याने नागरिकांना घरबसल्या अर्ज करून गॅझेट मिळविणे शक्य झाले आहे.
तुम्हाला नाव, जन्मतारीख बदलासाठी गॅझेट करायचंय?
दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट आणि जन्मदाखला यातील जन्मतारीख आणि नावात तफावत आहे, लग्नानंतर नावात बदल करायचा आहे. तर मग आता कोणत्याही एजंटकडे जाण्याची गरज नाही. नागरिक आता घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून 8 दिवसांत त्यांचे बदललेले नाव अथवा जन्मतारिख याचे गॅझेट मिळवू शकतात. सरकारने गॅझेट प्रसिध्द केल्यानंतर त्याची फक्त प्रिंट घ्यायचे काम बाकी.
इथे करा अर्ज – अर्जासाठी लिंक – https://dgps.maharashtra.gov.in/1035/Homeनाव, वय, धर्म बदलासाठी लागणारा कालवधी – सर्वसाधारण 15 दिवसनाव, वय, धर्म बदलासाठी लागणारे शुल्क :- शासन शुल्क खुला वर्ग – रु. 523.60/– शासन शुल्क आरक्षित वर्ग (ई.मा.व. वगळून) – रु. 273.60/-
नावात बदलाबाबत आवश्यक कागदपत्रे :
1. ओळखीचा पुरावा (कोणताही एक)
पॅन कार्ड, पासपोर्ट,आधार कार्ड,मतदान कार्ड
2. निवासी पत्त्याचा पुरावा (कोणताही एक)
आधार कार्ड,रेशन कार्ड,वीज बिल
3. वयाचा पुरावा (अल्पवयीनकरिता)
जन्माचा दाखला, कायदेशीर दस्तऐवज,शपथपत्र (मधल्या नावात बदलाकरिता)विवाह प्रमाणपत्र (विवाहनंतरच्या नावात बदलाकरिता)
4. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
जन्मतारीख बदलाबाबत आवश्यक कागदपत्रे :
1. ओळखीचा पुरावा (कोणताही एक)पॅन कार्डपासपोर्टआधार कार्डमतदान कार्ड
2. निवासी पत्त्याचा पुरावा (कोणताही एक)आधार कार्डरेशन कार्डवीज बिल
3. वयाचा पुरावा (अल्पवयीनकरिता)जन्माचा दाखला
4. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
धर्म बदलाबाबत आवश्यक कागदपत्रे :
1. ओळखीचा पुरावा (कोणताही एक)
2. निवासी पत्त्याचा पुरावा (कोणताही एक)
आधार कार्ड
रेशन कार्ड
वीज बिल
3. कायदेशीर दस्तऐवज
शपथपत्र
4. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र