मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीमराठी भाषा दिनानिमित कार्यक्रमाला हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पुस्तक प्रदर्शन सोहळा पार पडला. राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात साधारणपणे 15 कोटी मराठी लोकसंख्या आहे. दीड-पावणे दोन कोटी बाहेरचे आहेत, बाकी मराठीच आहेत. काही ठराविक नाटकं, चित्रपट सोडले तर प्रेक्षक पाहायला का जात नाही. आपण सगळ्याच दृष्टीकोनातून कात टाकणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी पुढे सांगितलं की, ”जी गोष्ट मला टीव्हीवर मोफत पाहता येते, ती पाहण्यासाठी मी पैसे देऊन चित्रपटगृहात जाणार नाही, त्याव्यतिरिक्त काही मिळालं तर जाईन. हिंदी चित्रपटसृष्टी मोठी वाटते, पण तिथेही दणादण चित्रपट आदळत आहेत, कारण लोकांना तोच-तोचपण नको आहे. जे चित्रपट चालले आहेत, ते सहजासहजी टीव्हीवर पाहता येत नाहीत, त्यामुळे ते चालतात. कात टाकणं आवश्यक आहे.”