गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरातील उद्योजक, कारखानदारांकडून होत असलेली मागणी व अखेर पूर्णत्वास गेली आहे. कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर ते दिल्ली थेट विमानसेवा सुरू होणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. येत्या 27 ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर विमानसेवा सुरू होणार असल्याने कोल्हापूर विमानतळाचा आणखी एक मैलाचा दगड गाठला गेला आहे.
त्याशिवाय कोल्हापूर आणि नागपूर तसेच कोल्हापूर ते गोवा या दोन्ही मार्गावर सुद्धा विमान सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धी दिलेल्य पत्रकातून माहिती दिली आहे. कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर इंडिगो कंपनीचे सुमारे 180 आसन क्षमतेचे विमान कोल्हापूर- दिल्ली-कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करणार आहे. कोल्हापूर-दिल्ली-कोल्हापूर या मार्गावर हवाई सेवा सुरू होण्याचा प्रस्ताव भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या महासंचालकानाकडे अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याला मान्यता मिळेल आणि कोल्हापूर ते दिल्ली थेट विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे.