इचलकरंजीचा पाणी प्रश्न सध्या खूपच जोर धरत आहे. इचलकरंजीतील विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांच्या पुढाकारांनी बुधवारी मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी अजितदादांनी विभागनिहाय प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. इचलकरंजी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.
राज्य शासनाची कोणत्याही परिस्थिती शहराला पाणी मिळायला पाहिजे अशी भूमिका आहे. शहराला मंजूर झालेल्या सुळकुड पाणी योजनेला दूधगंगा काठावरून विरोध होत आहे आणि हे थांबवण्यासाठी समन्वय ठेवून एकमत करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आम.प्रकाश आवाडे यांना दिलेल्या आहेत.