आटपाडी तालुक्यातील पहिले तंत्रशुद्ध क्रिकेट प्रशिक्षण केंद्र मार्फत श्रीमंत बाबासाहेब देशमुख स्पोर्ट्स अकॅडमी शुभारंभ आज म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी डायनेमिक इंग्लिश मीडियम स्कूलच्या पाठीमागे बलभवन मैदानात होणार आहे. यासाठी माजी खासदार संजय पाटील, तहसीलदार सागर ढवळे, माजी जि.प. अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यामध्ये व्यावसायिक व अनुभवी प्रशिक्षकाद्वारे प्रशिक्षण, पाच ते अठरा वर्षातील मुले व मुलींसाठी प्रशिक्षण, सरावासाठी सर्वोत्तम दर्जाचे कृत्रिम टर्फ विकेट, नियमित सराव सामने आणि स्पर्धांचे आयोजन तसेच 365 दिवस प्रशिक्षण वर्ग, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे व्हिडिओ विश्लेषण, वैयक्तिक प्रशिक्षण आणि कोचिंग, तांत्रिक कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती या सुविधा दिल्या जाणार आहेत.
Related Posts
१०० टक्के तंबाखूमुक्त शाळांचा तालुका म्हणून मिळाला आटपाडीला बहुमान
राज्यात १०० टक्के तंबाखूमुक्त शाळा असणारा तालुका म्हणून आटपाडीला बहुमान मिळाला आहे. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या…
‘सरपंच ते आमदार’ की मिळवण्यापर्यंतचा आमदार अनिल बाबर यांचा प्रवास……
अनिल बाबर यांना पाणीदार आमदार म्हणून ओळखले जाते. अनिल बाबर हे खूप मोठे राजकारणी नेते होते. त्यांचे आज आकस्मिक निधन…
म्हशी चोरून बाजारात विक्री! चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
जनावरांच्या बाजारातून कत्तलखान्याकडे जाणारी जनावरे, चोरी रोखण्यासाठी पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते.त्यावेळी पोलिसांना काही जणांची हालचाल संशयित वाटल्याने संशयावरून त्यांच्याकडे…