बिग बॉस मराठी सीझन 5 चा सध्या तिसरा आठवडा सुरु आहे. बिग बॉस देत असलेले एकापेक्षा एक टास्क पूर्ण करण्यात सदस्यांच्या अगदी नाकीनऊ येत आहे. त्यातच दोन टीम पडल्या असून एकमेकांमध्ये हाणामारीपर्यंत भांडणं सुरु झाली आहेत. या सगळ्यात नेहमी शांत असणाऱ्या साध्याभोळ्या सूरजने सुद्धा आता टास्कवेळी रौद्र रुप धारण केलेलं पाहायला मिळतंय.

नवीन आलेल्या प्रोमोत सूरज चव्हाणचा वेगळाच अवतार पाहायला मिळत आहे.नेहमी शांत असणाऱ्या आणि प्रेक्षकांचा फुल्ल सपोर्ट मिळणाऱ्या सूरज चव्हाणने आता त्याचं हत्यार काढलं आहे. कलर्स मराठीने नवीन प्रोमो शेअर केला आहे. ‘ए’ टीम आणि ‘बी’ टीम यांच्यात फास्ट फूड टास्क पार पडत आहे.

या टास्कवेळी पहिल्यांदाच सूरजचं रौद्र रुप पाहायला मिळत आहे. सूरज आणि अरबाज टास्कवेळी आमनेसामने आले आहेत. तर दुसरीकडे वैभव सूरजला काही सूचना करताना दिसतोय. ‘तू हात पाय असं का मारतोय? असं वैभव त्याला विचारतो.त्यावर सूरज चिडून ‘त्याला हाणलं नाहीये मी अजून…माझं मी बघेन’ असं म्हणतो. हा प्रोमो सध्या तुफान व्हायरल होतोय. अखेर सूरज आता चवताळून उठल्याने त्याचे चाहतेही खूश झालेत. खेळ कॅप्टन्सीचा, कल्ला मात्र सूरजचा… हा कॅप्टन्सीच्या टास्क सूरज गाजवणार हे नक्की आहे.

सूरजचा हा अवतार पाहून घरातले सगळेही शॉक झालेत. यावेळी कॅप्टन्सी कोणत्या टीमकडे जाते आणि कोण कॅप्टन होतो हे याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.