विटा येथे खडी क्रेशरचे लोखंडी पार्ट चोरणारी कडेगाव तालुक्यातील येतगाव येथील एक टोळी विटा पोलिसांनी पकडली आहे. महेश विष्णू पानसरे (वय २४), रोहन जयसिंग सावंत (वय १९), रणजित वसंत उथळे, (वय २७) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत विटा पोलीस ठाण्याचे हवालदार प्रमोद साखरपे यांनी फिर्याद दिली आहे.नाकाबंदी सुरू असताना भरता वेगाने तासगावकडून मायणीच्या दिशेने एक कार (एम एच ए एफ ५६५२) निघाली होती.
पोलिसांनी चालकाला इशारे करूनही ती कार चालकाने न थांबवल्यामुळे त्यांना संशय आला आणि त्यांनी तो पाठलाग करून गाडी थांबवली. चालकाकडे चौकशी केली असता गाडी फलटणच्या दिशेने जात आहे, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले.त्यावेळी त्या गाडीमध्ये त्यांना खडी क्रेशरचे लोखंडी पार्टस् आढळले. ते साहित्य कोठुन तरी चोरुन आणल्याच्या संशयावरून चालक महेश पनासरे आणि त्याचे दोन साथीदार रोहन सावंत आणि रणजित उथळे यांना अटक केली आहे.