विट्यात शिवसेना, भाजप आणि मित्र पक्षांच्या वतीने भव्य हळदीकुंकू कार्यक्रम…..

नुकताच मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला. सध्या अनेक सुहासिनी महिलांच्या घरी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच अनेक गावतही महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेतले जातात. विटा शहरात सर्वात मोठ्या हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. भाजपा आणि शिवसेनेच्या वतीने हे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज 2४ जानेवारीला पंचफुला मंगल कार्यालयात हळदीकुंकूचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात प्रथम पाच हजार महिलांना इडली कुकर, टिफिन बॉक्स किंवा हॉटपॉट भेट देण्यात येणार आहे. महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर शितलताई बाबर यांनी केलंय विटा शहरातील महिलांनी एकत्र येऊन मकर संक्रांत सणाचा आनंद लुटावा यासाठी शिवसेना भाजप आणि मित्र पक्षांच्या वतीने भव्य अशा हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केल्याची माहिती ॲड. शितलताई बाबर यांनी दिली.

मकर संक्रांतीनिमित्त होणाऱ्या या भव्य हळदीकुंकू समारंभास येणाऱ्या प्रथम पाच हजार महिलांना इडलीचा कुकर, टिफिन बॉक्स किंवा हॉटपॉट भांडे भेट देण्यात येईल. या कार्यक्रमास सौ.सोनियाताई सुहास बाबर, सौ.नेहाताई किशोर ढोंबे , सौ. सिंधुताई कृष्णात गायकवाड, सौ. देवता अनिल बाबर या प्रमुख उपस्थित असणार आहेत.