गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांचे टेन्शन दूर…..

विधानसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ सुरु आहे. कोणी जिल्ह्यांमध्ये जाऊन प्रचार दौरे करत तर कोणी योजना जाहीर करतंय.राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी सरकारने नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केली.

महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान भाजपकडून कोकणी मतदाराना खूष करण्यासाठी महा मेगा प्लॅन आखण्यात आलाय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणी मतदारांना खुश करण्यासाठी भाजपचा महा मेगा प्लॅन आणला आहे. गणपतीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजपकडून विशेष बस आणि रेल्वे सोडण्यात येणार आहेत. मुंबई महानगरातून तब्बल 700 बसेस आणि 6 ट्रेनचे नियोजन करण्यात आले आहे.

लवकरच बस आणि ट्रेनच्या बुकिंगला भाजप कार्यालयात सुरुवात होणार आहे. मुंबईत कोकणी मतदारांचा आकडा मोठा आहे.याच मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून सर्वाधिक बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.