कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण; PM रिपोर्टमध्ये १५० ग्राम वीर्य?, अखेर सत्य समोर

९ ऑगस्टला कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. तीन डॉक्टरांच्या पॅनलने या महिला डॉक्टरवर शवविच्छेदन केलं होतं. यामध्ये महिला फॉरेन्सिक शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचा समावेश होता. घटनेच्या पाच तासांनंतर फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. तेव्हा जमिनीवर पडलेले वीर्य हे वाळले होते आणि घट्ट झालेले टीमला आढळले. त्यांनी पृष्ठभागावर कोरुन वीर्याचे नमुने गोळा केले होते. वीर्य किंवा कोणतेही द्रव पदार्थ आढळून आलेला नव्हता, असं सांगण्यात आलं आहे.

आरजी कर मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरबाबत जी घटना घडली त्याप्रकरणी आता नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. शवविच्छेदन अहवालात डॉक्टरच्या शरीरात १५० ग्रॅम वीर्य आढळून आल्याची माहिती समोर आली होती. पण, हे वीर्य नसून हे वजन डॉक्टरांच्या गर्भाशयाचे असल्याचा दावा केला जात आहे. डीएनए अहवालाचे विश्लेषण केल्यानंतर, डॉक्टरांनी सांगितले की १५० ग्रॅम म्हणजे पीडितेच्या अंतर्गत किंवा अंतर्गत जननेंद्रियाचे वजन, विशेषत: गर्भाशयाचे वजन आहे.

डॉक्टरांनी सांगितले की फॉरेन्सिक शास्त्रज्ञ आणि डॉक्टर नेहमीच अशा अहवालांमध्ये अवयवांचे वजन लिहितात. या प्रकरणात १५० ग्रॅम भौतिक मोजमापाशी संबंधित आहे. कुठल्या द्रव्याचं नाही.गुन्हा झाल्यानंतर गोळा केलेले रक्त, वीर्य आणि योनीतील स्वॅब्ससह नमुने गुन्ह्याच्या तीन दिवसांनंतर १२ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत सादर करण्यात आले. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, फॉरेन्सिक टीम ते योग्यरित्या गोळा करणे आणि त्याची नोंदणी करणे आणि केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत सादर करणे ही प्रक्रिया प्रोटोकॉलद्वारे केली जाते, ज्यासाठी वेळ लागतो.