मंगळवेढा तालुक्यात २७ – ग्रामपंचायतीसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या – वेळेत सरासरी ८१.४८ टक्के मतदान झाले आहे. मतदान = प्रक्रियेदरम्यान कुठेही अनूचित • प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले असून सोमवारी सकाळी ८.०० वा. शासकिय – गोडावून येथे मतमोजणीस प्रारंभ होवून सकाळी ११.०० वाजेपर्यंत सर्व निकाल घोषीत होणार असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली. तालुक्यातील आंधळगांव, शिरसी, अकोले, शेलेवाडी, लक्ष्मी दहिवडी, जालिहाळ- सिध्दनकेरी, रडे. खडकी, जुनोनी, खुपसंगी, मानेवाडी, रेवेवाडी, लोणार, पडोळकरवाडी, महमदाबाद हुन्नूर, हिवरगांव, भाळवणी, जंगलगी, निंबोणी, चिक्कलगी, नंदूर, डिकसळ, मुंढेवाडी, (उचेठाण, बठाण, देगाव आदी गावच्या ग्रामपंचायतीसाठी रविवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली.
एकूण ५२ ३१० पैकी पुरुष मतदार २२, ५५८ तर स्त्री मतदार २०, ०६२ असे एकूण ४२, ६२० मतदारांनी आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका असल्याने अत्यंत चुरशीने शेवटच्या वेळेपर्यंत मतदान झाल्याचे चित्र होते. यामध्ये वृध्द व्यक्तीनीही काठीचा आधार घेत आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ११.३० पर्यंत सरासरी ३२.१० टक्के मतदान झाले होते. मजुरांनी कामावरून येवून मतदान केले. सरपंचपदासाठी ७० उमेदवार तर सदस्यपदासाठी ५१७ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले राजकिय नशीब अजमावत आहेत.
या निवडणूकीसाठी ९४ मतदान केंद्रे ठेवण्यात आली होती. मतदान प्रक्रियेदरम्यान डी. वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड, तहसीलदार मदन जाधव, पोलिस निरिक्षक रणजित माने आदी सर्व मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याने कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततामय वातावरणात मतदान पार पडले. सोमवारी सकाळी ८.०० शासकिय गोडाऊनमध्ये मतमोजणीस प्रारंभ होणार असून यामध्ये एकूण ७ फेन्या ठेवण्यात आल्या आहेत.. फेरीनिहाय गावाची नावे: – पहिली फेरी व गावे -शेलेवाडी, शिरसी, खडकी, जुनोनी, देगांव दुसरी फेरी अकोले, बठाण, उचेठाण, महमदाबाद हुन्नूर, रेवेवाडी तिसरी फेरी चिक्कलगी, भाळवणी, जंगलगी, डिकसळ, मुंढेवाडी चौथी फेरी खुपसंगी, निंबोणी, लोणार, लमाणतांडा, मानेवाडी पाचवी फेरी लक्ष्मी दहिवडी, रखे सहावी फेरी नंदूर, आंधळगांव, पडोळकरवाडी सातवी फेरी जालिहाळ, हिवरगांव आदी होत. दरम्यान बंदोबस्ताकामी ७ पोलिस अधिकारी, ६६ पोलिस कर्मचारी, ५८ होमगार्ड असे एकूण १२४ पोलिस कर्मचारी बंदोबस्तकामी नेमण्यात आले होते.