त्रिमूर्ती अर्बनमुळे य. मंगेवाडी – आजनाले परिसरात नवीन अर्थकारणाला सुरुवात झाली

आजनाले य.मंगेवाडी, नाझरा या परिसरातील गावे मोठ्या कष्टाने आणि आपल्या कर्तुत्वाने पुढे आले आहेत. यामुळे जगाच्या नकाशावर या गावाचे नाव कोरले आहे. डाळिंबावर रोग प्रादुर्भाव आला आणि सर्व बागा उध्वस्त झाल्या असल्या तरी परिस्थितीशी संघर्ष करून येथील बहादर शेतकन्यांनी दूध उत्पादनावर मोठा भर दिला आहे. आर्थिक उलाढाल होत असताना परिसराला पतसंस्था बँकेची गरज होती ती गरज ओळखून चेअरमन चंद्रकांत चौगुले यांनी त्रिमूर्ती अर्बन च्या नावाने सोसायटी अर्थात बँकेची निर्मिती केली आहे.

यामुळे परिसराच्या अर्थकारणाला चालना मिळेल तसेच त्रिमूर्ती अर्बनमुळे परिसरात नवीन अर्थकारणाला सुरुवात झाली यातून निश्चितपणे येथील लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण होतील आणि या त्रिमूर्ती अर्बनची भरभराट होईल अशा शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. आम दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिल्या. त्रिमूर्ती अर्बन को-ऑप. सोसायटी लि. य. मंगेवाडी चा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी मठ उत्साहात संपन्न झाला. यावेळी शुभेच्छा देताना मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील बोलत होते. या कार्यक्रमासाठी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील, ज्येष्ठ नेते पुढे बोलताना दिपकआबा बाबुरावभाऊ गायकवाड, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयमालाताई गायकवाड, भाजपा सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार सावंत, धुळे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, मा. डीवायएसपी माडगूळकर साहेब, जिल्हा दूध संघाचे संचालक विजयदादा येलपले, मा. नगरसेवक सचिन लोखंडे, आनंदाभाऊ माने, मा. नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार, मा. जिल्हा परिषद सदस्य अतुलमालक पवार, युवा नेते योगेश दादा खटकाळे, मायाका प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलिंग (बाबू) गावडे, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, उद्योगपती अमोल विभुते, मा. सरपंच विजय पवार, बाबुराव यांच्यासह विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य, यलमार मंगेवाडी व अजनाळे गावातील नागरिक विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच त्रिमूर्ती अर्बन चे सर्व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले सहकार क्षेत्रात काम करणं म्हणजे सतीचा वाण आहे.

बकिंग क्षेत्रात स्पर्धा वाढले आहेत संस्था चालवत असताना वाईटपणा घ्यावा लागतो. वसुलीच्या बाबतीत काटेकोरपणा ठेवला पाहिजे. या निमित्ताने या परिसराला बँकेची अर्थात सोसायटीची गरज होती ती गरज आज त्रिमूर्ती अर्बनच्या निमित्ताने पूर्ण झाले असून यामधून निश्चितपणे भरभराटी होईल अशा शुभेच्छा देत तालुक्याचा पाणी प्रश्न बन्यापैकी मार्गी लागला आहे सध्या दुधाच्या दरासंदर्भात पशुपालकांमधून नाराज असतील तरी या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पर्यंत येथील मागणी पोहचवून शेतकन्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. यावेळी अभिजीत आबा पाटील म्हणाले, ग्रामीण भागात अर्थकारणाला गती देण्यासाठी त्रिमूर्ती अर्बन हे फायदेशीर ठरणार आहे.

येथील लोकांच्या गरजा पूर्ण होतील, अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळेल असा विश्वास देत संस्थेला उभारी देण्यासाठी सर्वांनी ठेवी ठेवल्या पाहिजेत मी ही ठेवी ठेवतो असे जाहीर करत शेतकरी वाचला तर देश वाचेल आज दूध उत्पादनात मोठी घसरण झाली आहे. सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये दुधावर प्रक्रिया करणारे केंद्र नाही याची खंत वाटते, दुधाला भाव द्या ग्रामीण आर्थिकरण सुधारेल असे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार म्हणाले, आर्थिक स्तोत्र निर्माण करणारे संस्था उभी राहत आहे, याचा मोठा आनंद होत असून विश्वासहावर ठेवी ठेवल्या जातात या परिसरामध्ये चंद्रकांत चौगुले यांनी मोठा विश्वास कमवलेला आहे त्यामुळे या परिसरात बँकेची भरभराटी होईल असे त्यांनी शुभेच्छा दिल्या.