प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात; ‘टेंभू’च्या पाण्यासाठी माण नदीकाठचे शेतकरी कासावीस तालुक्यातील बहुतांश भागात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची टंचाई खूप जाणवू लागली आहे. सांगोला तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असणे, हे नित्याचेच आहे. निसर्गाच्या अशा लहरीपणामुळे शेतकरी सतत अडचणीत येताना दिसत आहेत. सांगोला शहरासहित तालुक्यातील वेगवेगळ्या भागात सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. माण नदीकाठच्या विहिरींनी तळ गाठला असून, विंधन विहिरींसह विहिरीही कोरड्या पडू लागल्या आहेत.
पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पाण्याची चवही बदलली आहे. माण नदीमध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी अद्याप आले नाही. ते आटपाडी भागातच मुरत आहे. त्यामुळे माण नदीकाठचे शेतकरी पाण्यासाठी कासावीस झाले आहेत.कोळा भागात शेतीच्या पाण्याचे जे तलाव आहेत, त्यामध्ये बुध्देहाळ, यमाई तलावात अद्यापही पाणी सोडले गेले नाही.लाभधारक शेतकऱ्यांनी रितसर पैसे भरले असताना व मागणी केलेली असतानासुद्धा या तलावात पाणी सोडले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय उरला नाही. घेरडी भागातील परिस्थिती याहून आणखी बिकट आहे. पिण्याचे पाणी पाच-पाच दिवस नागरिकांना मिळत नाही.
शेतीच्या पाण्याचे तर सोडाच, बहुतांश पिके हातातून गेली आहेत. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. अशीच परिस्थिती जवळा भागातसुद्धा आहे. जवळा भागातसुध्दा आठवड्यातून तीन ते चार दिवसांआड पिण्याचे पाणी येत आहे. शेतीच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची इथेही बिकट परिस्थिती आहे.महूद भागातही काही वेगळे चित्र नाही. लक्ष्मीनगर, इटकी, कटफळ अशा भागात पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण सुरूच आहे. लक्ष्मीनगरमधील नाहीशी झाली आहेत. नीरा उजवा महिलांनी तर पाण्यासाठी टाहो फोडून आपल्या व्यथा मांडल्या कटफळआहेत.येथीलराजेवाडी तलाव भरुन घेण्याची मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकऱ्यांची पिके पूर्णत नाहीशी झाली आहेत.