महायुती सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर ३ हजार रुपये जमा होत आहेत. ज्या महिलांना अद्याप पैसे मिळाले नाहीत त्या महिलांनी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करावे, असे आवाहन हातकणंगले तालुका मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना समितीचे सदस्य दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी केले आहे.
तसेच या योजने अंतर्गत महिलांना मिळणारे पैसे बँकांनी कोणत्याही कर्ज खात्यास वर्ग करू नयेत, ते सर्व पैसे संबंधित महिला भगिनींना रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यासाठी तात्काळ द्यावेत, अन्यथा त्या बँकांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा डॉ. माने यांनी दिला आहे.