इचलकरंजी शहरातील पीएलसी सायझिंग मध्ये हमाली व बीमांची वाहतूक करणाच्या पोलीच्यावतीने अवाजवी दंडाची आकारणी करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ शनिवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले होते. शनिवारी मध्यरात्रीपासून टेम्पो चालकाने आपले व्यवसाय बंद करून जी. के. नगर जवळील खुल्या मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. सोमवारी सकाळच्या दरम्यान माजी नगरसेवक मदन कारंडे, डॉ. राहुल आवाडे यांनी आदोलकांशी समन्वय साधला.
चालकाच्या व्यथा मांडल्या. त्यानंतर योग्य तोडगा काढण्यात आल्यानंतर संप मागे घेतला.इचलकरंजीतील पीएलसी सायझिंग बिमे वाहतूक टेम्पो धारक संघटनेच्या काम बंद आंदोलन मागे घेतले. माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, मदन कारंडे यानी यशस्वी शिष्टाई केली. पोलीस व टेम्पो चालकांच्यात चर्चा घडवून आणत कायदा व व्यवहाराची सांगड घालत व्यवसाय करण्यास परवानगी दिल्याने, गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेले टेम्पो चालकांचे आंदोलन स्थगित करण्यात आले.