सध्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक वेगवेगळे चित्र समोर आपणाला पाहायला मिळत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आणि महाविकास आघाडीतून इच्छुक असलेले गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाच्या प्रस्तावाला नकार दिला आहे.
कोल्हापूर मतदारसंघ सर्वत्र पिंजून काढला असताना त्यांना हातकणंगलेतून उमेदवारीचा प्रस्ताव ठाकरेंनी दिला होता. मात्र, त्यांच्या या प्रस्तावाचा सन्मानपूर्वक नकार देत कोल्हापूरमधूनच अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत नरकेंनी दिले आहेत.