गावभेट दौऱ्यात दिपकआबांना राखी बांधून महिलांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण

दिपकआबांच्या गावभेट दौऱ्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या या जनसंवाद ‘यात्रेनिमित्त सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. ग्रामीण भागात खेडोपाडी राहणाऱ्या नागरिकांना दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणी या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने सुटत आहेत. निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणे हेच आपले संस्कार आणि वारसा असल्याने कोणताही राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता जनतेची सुखदुःखे जाणून घेत जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न दिपकआबा साळुंखे पाटील करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा गावभेट आणि जनसंवाद दौरा दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय ठरत असून दररोज हजारो नागरिकांना गावभेट दौऱ्यातून न्याय मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आबांच्या गावभेट दौऱ्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. शनिवार दि. १७ ऑगस्ट रोजी लोनविरे, हणमंतगांव, मानेगणव, निजामपूर, गावातही आबांच्या गावभेट दौ-याला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. वड्यावस्त्यवरील हजारो नागरिकांशी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिलखुलास संवाद साधला.