केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांच्या उद्दिष्ट पूर्तीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी उपस्थित प्रशासनातील अधिकारी वर्गाला त्यांनी विविध योजनांच्या अनुषंगाने आढावा घेऊन सूचना केल्या.
कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून योजनांची अंमलबजावणी करावी तसेच बैठकीत पदाधिकारी, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून त्याची तात्काळ पूर्तता करा, केंद्र शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांची अंमलबजावणी करताना त्यांची उद्दिष्टे पूर्ण होत आहेत का याची खात्री करा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभेत केंद्र शासनाच्या योजनांचा विभाग निहाय आढावा घेण्यात आला. योजनांचा उद्देश पूर्ण होण्यासाठी योजनांची अंमलबजावणी गुणवत्तापूर्वक करण्याच्या सूचनाही खासदार धैर्यशील माने यांनी दिल्या.