हरिनाम सप्ताहाने ‘लेंगरेवाडी’ यात्रेची सुरुवात


ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश तात्या माडगूळकर यांनी बनगरवाडी कादंबरीत साकारलेल्या लेंगरेवाडी (ता. आटपाडी) येथील यात्रेची सुरुवात हरिनाम सप्ताहाने सुरवात होते. ग्रामदैवत विटा काळंबा देवीच्या यात्रेत गेल्या ४० वर्षांपासून अनोखा धार्मिक सोहळा साजरा केला जातो. महिलांसाठी कार्यक्रमही आयोजित केला जातो.


या यात्रेच्या माध्यमातून सामाजिक संदेशाची परंपरा जपली आहे. दहा दिवसांच्या यात्रेत पाच दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. शेवटच्या दिवशी ज्या कुटुंबात मुलीने जन्म घेतला आहे त्या कुटुंबाचा सन्मान केला जातो.
लेंगरेवाडी गावाच्या यात्रेची सुरुवात अखंड हरिनाम सप्ताहाने होणारे हे आदर्श गाव आहे.यात्रेत गेल्या ४० वर्षांपासून अनोखा
धार्मिक सोहळा साजरा केला जातो.

सप्ताह संपल्यानंतर दुसऱ्यादिवशी ग्रामदैवत विटा काळंबा देवीचा महाप्रसाद होतो. त्याचवेळी मुख्य यात्रा भरते. यात्रेची ही परंपरा ग्रामस्थांनी जोपासली आहे. दोन दिवस चालणाऱ्या यात्रेत पहिल्या दिवशी सायंकाळी गोड नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत यात्रा सुरू राहते. यावेळी नवस केलेल्या महिलेचा निर्जळी उपवास सोडला जातो. यात्रेच्या दुसऱ्यादिवशी बैलगाडीने मायाक्का चिंचली यात्रेला गावकरी रवाना होतात.