आता आटपाडीत हे पाटील उतरणार आखाड्यात……

विधानसभा निवडणुकीचे वारे आता जोरदार वाहू लागलेले असताना आटपाडी मधून संभाजी शेठ पाटील यांनी विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतल्याने मतदार संघात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. संभाजी शेठ पाटील हे गलाई व्यावसायिक असून त्यांनी सामाजिक कार्यामध्ये नेहमी सहभाग नोंदवला आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदारकी लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

असे असताना संभाजी शेठ पाटील यांनी नुकतेच खासदार विशाल पाटील यांना शेतकऱ्यांचे पगलाई व्यावसायिकांच्या समस्यांचे निवेदन देऊन सखोल चर्चा केली. संभाजी शेठ पाटील यांच्या उमेदवारी करण्यामागे त्यांनी प्रस्थापितांवर अनेक प्रश्न उपस्थित केले.

नावालाच आहे बळीराजा कधी संपणार आहे त्यांच्या अवकळा जनतेचा आता निर्धार पक्का विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांना देऊ धक्का अशा आशयाचे बॅनरही त्यांनी सर्वत्र झळकवले आहेत. संभाजी शेठ पाटील यांनी सर्वांना विधानसभा निवडणुकीत सहकार्य करावे असे आवाहन केले आहे