IPL 2025: मुंबई इंडियन्स रोहित शर्मासह 4 खेळाडूंना डच्चू देणार? मोठी अपडेट……

आयपीएल 2025 च्या हंगामाच्या मेगा लिलावाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. पण आयपीएलमधील संघ कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवणार, याबाबत सोशल मीडियावर सध्या चर्चा रंगली आहे. याचदरम्यान आयपीएलच्या मेगा लिलावाबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आयपीएलच्या लिलावाआधी सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, केवळ रोहित शर्माच नाही तर कर्णधार हार्दिक पांड्यालाही आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्समधून रिलीज केले जाऊ शकते. रोहितसह 4 प्रमुख खेळाडूंना डच्चू?

आयपीएल 2025 मध्ये हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केले होते. रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार करण्यात आले. मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माच्या हातून सोडून हार्दिकच्या हाती गेले. गेल्या हंगामातही रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापन यांच्यातील संबंध फारसे चांगले नसल्याचा अंदाज लावला जात होता. आता केवळ रोहितच नाही तर हार्दिक पांड्यालाही संघातून वगळले जाऊ शकते अशी बातमी आहे. त्यांच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज टीम डेव्हिड यांनाही संघातून रिलीज केले जाण्याची शक्यता आहे.

हे खेळाडू कायम ठेवता येतील: सूर्यकुमार यादव (संभाव्य कर्णधार), जसप्रीत बुमराह, इशान किशन, तिलक वर्मा

हे खेळाडू रिलीज केले जाऊ शकतात: रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जेराल्ड कोएत्झी, टीम डेव्हिड