इचलकरंजीत नियमबाह्य जीवघेणी वाहतूक सुरूच

गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी शहरात सतत चर्चेत असणाऱ्या नियमबाह्य वाहतुकीचा प्रश्न अद्यापही कायम राहिला आहे दोन दिवसांपूर्वी टेम्पो चालक आणि प्रशासन यांची बैठक होऊन कोणाच्याही जीविताला धोका होणार नाही अशा पद्धतीने औद्योगिक वाहतूक करण्याचे निश्चित झाले होते. मात्र प्रत्यक्षात ते दिसून आले नाही पंधरा दिवसांपूर्वी खंजिरे औद्योगिक वसाहतीत टेम्पो मधून बाहेर आलेले बिम डोक्यात लागल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरातील नियमबाह्य वाहतुकीचा प्रश्न चांगलाच चर्चेत आला होता.

वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्यावर कारवाई देखील सुरू केली होती मात्र ही कारवाई थांबवण्यासाठी टेम्पो चालकांनी काम बंद आंदोलन केले तोडगा देखील निघाला. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही असे निदर्शनास येत आहे टेम्पो चालकांनी देखील आपल्या वाहनातून औद्योगिक वाहतूक काळजीपूर्वक करावी त्याचबरोबर पोलिसांनी देखील अशा वाहनांवर कारवाई करावी जी मागणी होत असली तरी इचलकरंजी शहराचा विचार करता शहर आणि परिसरात औद्योगिक वाहतूक मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे सर्वांनीच नियमाच्या अधीन राहून काम करावे असे नागरिकांतून बोलले जात आहे