खानापूर आटपाडी मतदारसंघात बाबर की पाटील?

सद्या सर्वच पक्षाने विधानसभेची तयारी सुरू केली आहे. राज्यात लोकसभेला महाविकास आघाडीला बऱ्यापैकी यश मिळाल्याने मात दुसरीकडे महायुतीही लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेच्या तयारीला लागली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या उमेदवारीसाठी शड्डू देखील ठोकण्यात आलेले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी मतदार संघाचा देखील समावेश होतो.

स्वर्गीय अनिल बाबर यांच्या मतदारसंघात सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केलेले दिसते. अनिल बाबर यांच्या निधनानंतर या मतदारसंघांमध्ये प्रभुत्व राखण्यासाठी बाबर गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यावेळी ताकतीने मैदानात उतरलेले आहेत. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांनी देखील यांनीही निवडणुकीचे संकेत दिलेत.

तर लोकसभेत पराभूत झालेले खानापूर आटपाडीचे भूमिपुत्र चंद्रहार पाटील यांनीही उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली तर निवडणुकीच्या मैदानात उतरणार अशी भूमिका घेतली. यामुळे यावेळेस खानापूर आटपाडी मतदारसंघात चौरंगी लढत होण्याचे संकेत सध्या दिसत आहेत. त्यामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघात बाबर की पाटील कोण मैदान गाजवणार? याविषयी तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.