राजेवाडी कारखाण्याची ४७ लाखांची फसवणूक

राजेवाडी (ता. आटपाडी) येथील सद्गुरू साखर कारखान्यास वाहन , घंटागाडी , मजूर व टोळी देण्यासाठी नोटरी करून ४७ लाख रुपये घेतले, पण वाहन , घंटागाडी , टोळी न देता फसवणूक केली आहे. याबाबत प्रवीण शिवाजी फुले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बीड जिल्यातील १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साखर कारखान्याकडून २२ ऑगस्ट २०२४ ते ५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान उचल घेतली त्यानंतर संगनमत करून त्यांनी श्री सद्गुरू साखर कारखान्यास कोणतेही वाहन किंवा मजूर पुरवले नाहीत आणि रक्कमही परत केली नाही . त्यामुळे प्रवीण शिवाजी फुले यांनी फिर्याद दिली दिली आहे. फिर्यादीनुसार , राजाभाऊ दत्तात्रय मुंडे (रा. पहाडी पारगाव ता. धारूर ), नितीन अश्रुबा नागरगोजे (रा. देवगाव , ता. केज ),महादेव चंद्रसेन मुंडे (रा. कोठारबन , ता. वडवणी ), रमेश पांडुरंग मुंडे,( रा.कोठारबन ता. वडवणी ) , , अंकुश भीमा अडगळे ,(रा. सोनोमोहा , ता. धारूर ), श्रीराम एकनाथ मुंडे (रा. चारदारी , ता. धारूर ), जालिंदर एकनाथ मुंडे (रा. चारदारी , ता. धारूर), बाळासाहेब राजेसाहेब मुंडे (रा. चारदारी , ता. धारूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.