पेठवडगावात महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा

पेठवडगाव लाटवडे रोडवरील यादव कॉलेजवर मित्रांने ४० मिनिटात पुर्वी बॉम्ब ठेवला आहे.असा दूरध्वनी डायल ११२ ला आला.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत महाविद्यालय रिकामे केले. तसेच परिसरात नाका बंदी केली. घटनास्थळी एटीएस व बॉम्ब शोधक पथक तातडीने दाखल झाले. त्यामुळे परिसरात या घटनेची चर्चा होत आहे. आमदार राजू आवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. अखेरीस हा कॉल बनावट असल्याचे स्पष्ट होताच शासकीय यंत्रणेने निश्वास सोडला.