अजितदादा गटाच्या वैभव पाटील यांचा महायुतीला घरचा आहेर मिळाला आहे. पश्चिम बंगालमधील अत्याचाराच्या घटनेचा विटे शहरात जाहीर निषेध करण्यात आला .मात्र हा निषेध राष्ट्रवादी अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्या घरातून आणि ते अध्यक्ष असलेल्या आदर्श शिक्षक संकुलाच्या वतीने करण्यात आल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात महायुतीमध्ये सत्तेत सहभागी राहून स्वतःच्या सरकारच्या विशेषता गृहमंत्री पदी असलेल्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात यावेळी शेरेरावी करण्यात आली. वैभव पाटील यांच्या पत्नी आणि माजी नगराध्यक्ष सौ प्रतिभाताई पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या काळात महिलांच्याकडे वाकडे बघणाऱ्यांचे डोळे काढले जायचे, अत्याचार करणाऱ्यांचा कडेलोट केला जायचा त्याच राज्यात असे कृत्य घडत आहे. हे अत्यंत निंदनीय आहे अशी थेट टीका केली.
तसेच माझ्या मुली माता भगिनी आज असुरक्षित आहेत त्यांना सुरक्षा मिळावी तसेच त्यांना न्याय मिळावा यासाठी स्त्री कायदा पास व्हावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली. त्यामुळे विट्याच्या पाटलांची पावले विरुद्ध दिशेकडे वळायला सुरुवात झाली आहेत काय असा सवाल विचारला जात आहे.