पट्टणकोडोली येथे शुक्रवार ता. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता श्री विठ्ठल बिरदेव मंदिर शेजारी यात्रास्थळी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी १ लाख १ हजार १११ रुपये बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक व माजी उपसरपंच डॉ.कृष्णाजी मसुरकर प्रथमच ग्रामीण भागातील सर्वात मोठी ही दहीहंडी असणार आहे. सिने अभिनेत्री स्मिता शेवाळे, शर्वणी पिल्लई हे प्रमुख आकर्षण असणार आहे. यावेळी दहीहंडीसाठी विविध भागातून स्पर्धक सहभागी होणार आहेत. फाउंडेशनतर्फे कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील माने, आमदार राजूबाबा आवळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही डॉ. मसुरकर यांनी सांगितले.
Related Posts
कोरोचीत क्रिकेट मैदानाची उभारणी
रणजी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामध्ये इचलकरंजी शहरातील खेळाडू चमकावेत या उद्देशाने खेळाडू निर्माणकरण्यासाठी कोरोची येथील पाच एकर जागेवर सुसज्ज आणि…
हातकणंगले मतदारसंघात राजकारण तापलं….
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजकीय वादळ घोंगावू लागलंय. या मतदार संघातील शिवसेनेचे विद्यमान…
विनय कोरे वाढवणार महायुतीची डोकेदुखी…..
सध्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी आपापली इच्छा, मत व्यक्त केले आहेत. कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे.…