हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दलितमित्र अशोकराव माने यांनी विधानसभा मतदानानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी महायुतीतील सर्वच नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन केलेल्या मदतीबद्दल आभार मानले.महायुतीतील प्रमुख घटकांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या.
त्याचबरोबर निवडणूक काळातील प्रचार यंत्रणेत अग्रभागी असणाऱ्या महायुतीच्या अनेक पदाधिकारी यांच्याशी फोनवरून आभार व्यक्त केले . त्याचबरोबर अशोकराव माने यांनी येणाऱ्या २३ तारखेला विजयाची खात्री देत दिवसभर आलेल्या कार्यकर्त्यांना भविष्यकाळात प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा व कार्यकर्त्यांना बळ देण्याचा शब्द दिला. माने यांनी आज संपूर्ण दिवस – मतदार संघातील कार्यकर्ते, हितचिंतक यांना वेळ देऊन त्यांचेही आभार मानले.