दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांची परत मिळणार परीक्षा फी! वैभव पाटील

शिवाजी विद्यापीठ कक्षेतील दुष्काळी तालुक्यातील असणाऱ्या विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षातील सर्व परीक्षांची फी माफीचा त्वरित आदेश काढा अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य आणि सांगली जिल्हा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी दिलेली आहे.

वैभव पाटील यांनी सांगितले की, सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमंकाळ, खानापूर, तासगावचा पूर्व भाग तसेच शिराळ्याचा पश्चिम भाग व सातारा जिल्ह्यातील काही दुष्काळग्रस्त आहेत तेथील विद्यार्थी जे उच्च शिक्षणामध्ये परीक्षा फी भरत आहेत अशा विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफ होण्यासंबंधी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केलेली आहे.

त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सचिवांना संदर्भित फी माफीबाबत त्वरित आदेश काढावा अशा सूचना देखील दिलेल्या आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फी भरलेली आहे त्यांना ती परीक्षा फी परत मिळणार आहे असे पाटील म्हणाले.