सांगोला शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या सांगोला नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन सन १९७९ साली लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात संपन्न झाले. अवघ्या तीन लाख रुपयात बांधलेल्या या इमारतीला ४५ वर्ष पूर्ण झाले होते.
या ३ मजली इमारती मध्ये एक नंबर खिडकी, मुख्याधिकारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष प्राणीपुरवठा उपनगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापती, स्वच्छता समिती सभापती, बांधकाम समिती सभापती यांच्यासह नगरसेवक हॉल, सभागृह यासह कर विभाग, बांधकाम विभाग, विद्युत विभाग आदी कामकाज मागील अनेक वर्षापासून सुरू राहिले आहे. नगरपालिका प्रशासकीय इमारतीवरील पाण्याची टाकी मोठ्या प्रमाणात गळत असल्याने मागील काही कालावधीमध्ये नगरपालिकेच्या डाव्या बाजूचा काही भाग कोसळला होता.
यासह सदरची इमारत धोकादायक असल्याची बाब समोर ठेवून, व नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी पालिका प्रशासनाने नगरपालिकेची जुनी प्रशासकीय इमारत पाडण्यासाठी सोलापूर येथील ठेकेदारास देण्यात आली. मागील काही दिवसापासून सदरची जुनी प्रशासकीय इमारत पाडण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये काल शनिवारी सदर इमारत पाडण्यासाठी ब्रेकर द्वारे प्रयत्न सुरू असताना, ब्रेकर ने कॉलमला हादरा दिला असता, इमारतीचा वरचा प्रमुख भाग खाली कोसळला. यामध्ये यातील इमारतीच्या काही भाग ब्रेकर वर कोसळला. या ब्रेकर मध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेळीच बाहेर धाव घेतल्याने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी, ब्रेकर चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.
सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी इमारतीचे बांधकाम पाडण्याचे काम हाती घेतली आहे. या निमित्ताने संबंधित प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन काम करणे गरजेचे आहे. याबाबतीत प्रशासनाने देखील खबरदारी घेणे महत्त्वाचे असून, परंतु याकडे गांभीर्याने बघितली जात नसल्याने काळ आला पण वेळ आली नाही असाच काहीसा प्रकार या निमित्ताने पहावयास मिळाला. याबाबत प्रशासन आता तरी जागे होणार का असा सवाल सांगोला वासियांकडून उपस्थित केला जात आहे.