श्री. दत्तात्रय सावंत यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी वासूद येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्री. दत्तात्रय चांगदेव सावंत यांची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे योगेश ढेकळे यांचे शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी जाहीर केल्या. नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले असून यावेळी जेष्ठ नेते बाबुराव भाऊ गायकवाड, नागेश पवार व दामोदर यादव उपस्थित होते.

आपली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, सांगोला तालुका अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार यांचे विचार आणि कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून पक्षाचे ध्येयधोरण यांच्याशी आपण बांधिल रहाल संघटना वाढीच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या आदेशाने आपण काम करत राहाल. याची आम्हाला अपेक्षा आहे. असे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी श्री. दत्तात्रय चांगदेव सावंत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.

सांगोला विधानसभा निवडणुकी मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या विजयामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी देशाचे कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे निष्ठेने काम करत असून, त्यांच्या निष्ठेचे आज त्यांना फलित मिळाले असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमधून बोलण्यात येत आहे. सामाजिक कार्यात नेहमीच ते हिरारीने सहभागी होत असून त्यांनी अनेक आंदोलने मोर्चामध्ये सहभाग नोंदवून अनेक सामाजिक प्रश्न मार्गी लावलेले आहेत. धाडसी व्यक्तिमत्व म्हणून दत्तात्रय सावंत यांची सांगोला तालुक्यात ओळख असून त्यांच्या निवडीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा विचार शाश्वत आहे. तो सर्वसामान्य माणसाच्या हिताचा आहे. तालुक्यात प्रत्येक गावात युवकांचे संघटन मजबूत करण्यावर माझा भर राहणार असल्याचे नूतन तालुकाध्यक्ष दत्तात्रय उर्फ डी. एस. सावंत यांनी सांगितले.