बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार घटनेच्या निषेधार्थ काल सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळी शिक्षा व्हावी यासाठी हे निषेध आंदोलन फीत बांधून निषेध आंदोलन केले. संपूर्ण देशभरात या घटनेचे पडसाद पडत असून त्या अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी व यातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हे निषेध आंदोलन करण्यात सांगोला शहरात करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देऊन या घटनेचा निषेध दर्शविला.
यावेळी ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत नाना घाडगे, शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद पाटील, शरद पवार गट राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. धनाजी पवार, विधानसभा प्रमुख कमरुद्दिन खतीब, युवा सेना तालुकाप्रमुख सुभाष भोसले, तालुका उपप्रमुख गोरख यजगर, शहर प्रमुख तुषार इंगळे, तालुका समन्वयक शंकर मेटकरी, युवा सेना शहर प्रमुख सौरभ चव्हाण, रामोशी समाजाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चव्हाण, तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, होलार समाज अध्यक्ष रघुनाथ ऐवळे, सावे ग्रामपंचायत सदस्य सुरेश पारसे, बाळासाहेब बनसोडे, सिद्धू पवार, दत्ता होनमाने, तानाजी गोडसे, चंदन जाधव, सुरेश गाडेकर सर, शफी इनामदार, नगरसेवक राजू भाई मगर, सुशील गवळी, महुद शहरप्रमुख अस्लम मुलाणी, संतोष खडतरे, कमलापूर शाखाप्रमुख संतोष टाकळे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
