शहाजीबापू गटाला खिंडार, दिपकआबांच्या उपस्थित कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष आणि शहाजीबापू गटामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शेकापसह शहाजीबापू पाटील गटाला सोडचिट्टी देत आतापर्यंत हजारो कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे.

शहाजीबापू गटातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून तसेच पक्ष नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून सांगोला तालुक्यातील तिप्पेहाळी येथील शहाजीबापू गटाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेतली. तिप्पेहाळीतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शहाजीबापू गटाला खिंडार पडले आहे. तिप्पेहाळी ता.सांगोला येथील शिवाजी निवृत्ती नरळे, बापू केराप्पा नरळे, दादासो बापू नरळे, ब्रह्मदेव नारायण नरळे, श्रीमंत धोंडीराम नरळे, रावसाहेब निवृत्ती नरळे, गोरखनाथ पांडुरंग नरळे, बाळू पांडुरंग नरळे, विलास पांडुरंग नरळे या शहाजीबापू गटाच्या कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे.

यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजय करण्याची ग्वाही दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत घाडगे, शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद पाटील, माजी नगरसेवक सतीश सावंत, युवा नेते सुरेश गवंड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.