केंद्र सरकार देशभरातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असते. यापैकी सरकार विविध प्रकारच्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत.गेल्या कित्येक वर्षांपासून केंद्र सरकार गरीब लोकांना मोफत रेशन देते.
सरकार सर्व शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशन पुरवते. मात्र आता त्यात मोठा बदल झाला आहे.पूर्वी सरकार शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ देत असे. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. मोफत तांदळाऐवजी आता सरकार 9 जीवनावश्यक गोष्टी देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत देशातील 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे. आता सरकार रेशनकार्डधारकांना मोफत तांदळाऐवजी 9 जीवनावश्यक गोष्टी देणार आहे.
यामध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारण्यात मदत होईल, अशी सरकारची अपेक्षा आहे.