मोठी बातमी! विधानसभेच्या निवडणुकीची तारीख ठरली

महाराष्ट्र विधानसभेची नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात घेतली जाऊ शकते, असे सुतोवाच CM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले.या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोण किती जागा लढविणार, याबाबतचा अंतिम निर्णय येत्या आठ ते दहा दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

२८८ सदस्यीय राज्य विधानसभेसाठी दोन टप्प्यांत निवडणूक घेतली जाऊ शकते, असे शिंदे आपल्या शासकीय ‘वर्षा’ निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप करताना सांगितले.

शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँगे्रसचा समावेश असलेले महायुतीचे सरकार सातत्याने विकास आणि कल्याणकारी योजनांवर काम करीत आहे आणि या योजनांना राज्यातील जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. आम्ही जागा वाटपावर चर्चा सुरू केली आहे. यासाठी गुणवत्ता आणि विजयाची खात्री हा महत्त्वाचा असणार आहे, असे CM Eknath Shinde मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.