सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश….

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत.हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. महाडमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. सुषमा दगडू अंधारे या पेशानं एक वकील आहेत.

राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी व स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या 2022 च्या दसरा मेळाव्यानंतर त्या चर्चेत आल्या. या मेळाव्यात त्यांनी आक्रमक शैलीत भाषण केले होते. सध्या त्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारक आहेत.