स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी हातकणंगले तहसील कार्यालयावर मोर्चा काढला पंचायत समिती पासून मोर्चाला सुरुवात झाली. मूक मोर्चामध्ये निलेवाडी पारगावसह पूरबाधित स्त्री पुरुषांचा सहभाग होता .मोर्चा तहसील कार्यालय समोर येऊन थांबला तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी बाहेर येत नसल्यामुळे मोर्चा करांनी तहसील कार्यालय समोर या आंदोलन चालू केले आणि त्यांनी या ठिकाणी भाषणे केली व थोड्यावेळाने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. गेल्या तीन वर्षात तिन्ही सालामध्ये ज्यांचे शेतीचे महापुरामुळे नुकसान झाले आहे .तसेच ज्यांच्या घरांमध्ये महापुराचे पाणी शिरून नुकसान होत आहे .तसेच पिके बाधित झाले आहेत. अशा शेतकऱ्यांना लगेच भरपाई द्यावी अशा मागण्या केल्या आहेत. तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठांकडे पाठवतो असे आश्वासन दिले आहे.
Related Posts
किणीत हिम्मतबहाद्दूर चषक कबड्डी स्पर्धा ३० नोव्हेंबरला
हातकणंगले तालुक्यातील किणी येथे प्रतिवर्षी दिवाळीदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या हिम्मतबहाद्दूर चषक कबड्डी स्पर्धा परतीचा पाऊस आणि निवडणूक आचारसंहितेमुळे लांबणीवर टाकल्या…
विद्या मंदिर संभाजीनगर शाळा हातकणंगले तालुक्यात द्वितीय
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचे केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय तपासणी मूल्यमापन पूर्ण झाले. यामध्ये सावर्डे केंद्रातून विद्यामंदिर संभाजीनगर…
हातकणंगलेतील बिरदेववाडी येथे विकासकामांचा शुभारंभ!
गावच्या सर्वांगीण विकासाठी गट-तट विसरून सर्वांनी एकत्रित आल्यास बिरदेववाडी गाव आदर्शगांव म्हणून नावारूपास येईल, असे मत माजी जि.प. सदस्य अरूणराव…