घरोघरी राष्ट्रवादी ही मोहीम प्रचंड यशस्वी करणार ! – सादिक खाटीक

विचार जपू या, घरोघरी राष्ट्रवादी मोहीमेत सहभागी होवूया या मोहीमेला सर्वार्थाने यशस्वी करीत राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब आणि राज्याचे नेते आमदार जयंतराव पाटील साहेबांचे विचार शहर, गाव, वाडी वस्ती, तळागाळापर्यंत पोहचविण्याचा निर्धार सादिक खाटीक यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार एक तास राष्ट्रवादी साठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून आज आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी गाव / प्रभाग भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यातल्या तेवीसाव्या आणि आटपाडीतल्या विसाव्या गाव- प्रभाग भेटीच्या बैठकीत बोलताना सादिक खाटीक यांनी हा निर्धार व्यक्त केला. हे भविष्य माझ्या हाती मी प्रचंड आशावादी मी राष्ट्रवादी मी महाराष्ट्रवादी ! या देश राज्य प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या भविष्याचा वेध घेण्याचा आशावाद व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती सर्वमुखी व्हाव्यात, यासाठी समर्पित वृत्तीने कार्यरत राहणार असल्याच्या भावना व्यक्त करून, सर्वत्र घरोघरी राष्ट्रवादी ही मोहीम यशस्वी करणार आहे. खानापूर, आटपाडी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करून अव्वलस्थानी आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे सादिक खाटीक यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रारंभी स्वागत प्रास्तावीक रियाज शेख यांनी केले इंजिनिअर असिफ कलाल, बाळासाहेब वंजारी, संपतराव पाटील, मुन्ना मुलाणी, उषाताई रसाळ, मुमताज खाटीक, रेश्मा बंडगर यांनी चर्चेत भाग घेत काही प्रश्न उपस्थित केले. यावेळी यप्पावाडीचे सरपंच संभाजीराव माने, सामाजीक कार्यकर्ते इंजिनियर असिफ कलाल, गोमेवाडीचे नेते संपतराव पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हा कार्यकारणी सदस्य मुन्ना मुलाणी, अविनाश पाटील, बटू उर्फ अल्लाबक्ष मुलाणी, सर्जेराव देवकुळे, मुस्लीम समाजाचे नेते बाळासाहेब उर्फ सलीम बंजारी, सामाजीक कार्यकर्ते रियाज शेख, असिफ भडाळे, वासीम भडाळे, मुमताज खाटीक, रेश्मा बंडगर- हाके, शमा खाटीक, इशरत जहाँ खाटीक, जयाताई ताटपुजे, जयाताई रेड्डी, समिना शेख, अमिना सय्यद, नजमावी शेख, शांताबाई लांडगे, श्रीमती तायराबी खाटीक, नंदाताई मेटकरी, उषादेवी रसाळ, शुभांगी जवळे, शाबेरा बेपारी, श्रीमती रशिदाबी खाटीक, इत्यादी अनेक जण उपस्थित होते. शेवटी बाळासाहेब वंजारी यांनी आभार मानले.