अनेक भागात विविध विकासकामे तसेच समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन करीत असतात. सध्या सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथे बेमुदत आमरण उपोषण सुरु आहे. सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथे सरपंचांने अतिक्रमण केले केले आहे. ते अतिक्रमण काढण्यासाठी उपोषण कर्ते योगेश गाडे यांनी 12वर्षांपासून अनेक कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. तरीही अद्याप अतिक्रमण हटवले गेले नाही. म्हणून उपोषण कर्ते योगेश उमाजी गाडे यांनी दि.25जानेवारी पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
गावठाण हद्दीतील दलित वस्तीमधील रस्त्यावरील अतिक्रमण काढून येण्याजाण्यास रस्ता खुला करण्यात यावा.कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करावी.अशी मागणी उपोषण कर्ते योगेश गाडे यांनी निवेदनात मागणी केली आहे.
