मा.सुहासभैया बाबर यांच्या प्रयत्नाने विटा – मिरज रस्ता होणार खड्डे मुक्त!

मिरज – फलटण हा राष्ट्रीय महामार्ग खानापूर तालुक्यातून माहुली, नागेवाडी, घानवड, गार्डी, विटा, कार्वे तसेच तासगाव तालुक्यातील आळते, लिंब, शिरगाव, वंजारवाडी, तासगाव, कवठेएकंद, कुमठे फाटा यामार्गे म्हैसाळला जातो.

या मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे व येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन धारकांना या खड्यांचा प्रचंड त्रास होत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील विटा – मिरज या रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवण्यास दोन दिवसांत सुरुवात होणार आहे. तसेच खड्डे बुजवण्याचे काम वेगाने पूर्ण करावे अशा सुचना सबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लवकरच हा रस्ता खड्डे मुक्त होईल, अशी ग्वाही युवा सुहास बाबर यांनी दिली.

याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता के. डी. मुधाळे यांच्याशी संपर्क साधून सदर खड्डे बुजविण्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी केली. यावर कार्यकारी अभियंता मुधाळे यांनी या मार्गावरील खड्डे चारच दिवसांत खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात होईल, असे सांगितले असल्याची माहिती बाबर यांनी दिली.